सोसायट्यामार्फत इलेक्ट्रीक वाहन कर्जसुविधा देण्यासाठी प्रयत्न करु - विवेक कोल्हे

सोसायट्यामार्फत इलेक्ट्रीक वाहन कर्जसुविधा देण्यासाठी प्रयत्न करु - विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे, जगाची वाटचाल आधुनिकतेकडे सुरू आहे. प्रवासासाठी इलेक्ट्रीकवर चालणारी वाहने बाजारात येवु लागली आहेत. ग्रामिण अर्थकारणात मोलाचा सहभाग देणार्‍या सहकारी सोसायट्या शेती कर्ज वितरीत करीत आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहन घेण्यासाठी कर्जपुरवठा व्हावा, अशी मागणी असंख्य सभासद शेतकर्‍यांनी केली असून त्याबाबत कर्जपुरवठा करून त्यातून उत्पन्नाचे साधन निर्माण होवु शकेल काय असा पर्याय समोर येत असून भविष्यात त्यादृष्टीने जाणिवपुर्वक प्रयत्न करु, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील ब्राम्हणगाव परिसरातील नवनिर्वाचित सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार शुक्रवारी लक्ष्मीबाई मंगल कार्यालय येसगाव येथे करण्यात आला. भाजपाचे तालुका सरचिटणीस दिपक चौधरी यांनी प्रास्तविक केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रविंद्र आगवण, चंद्रभान रोहोम यांची यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक साहेबराव कदम, निवृत्ती बनकर, विश्वासराव महाले, वेणुनाथ बोळीज, सुनिल देवकर, नवनाथ आगवण, बापू सुराळकर, दिनेश कोल्हे, दगुराव चौधरी, अतुल सुराळकर, गोरख आहेर, भिमराव भुसे, शिवाजीराव कदम, दगडु दरेकर, सुभाष गायकवाड, सुकदेव सोनवणे, अशोक येवले, चंद्रकांत देवकर, रामदास देवकर, संदिप देवकर, निलेश देवकर, अंबादास देवकर, बाळासाहेब कदम, वाल्मीक भास्कर, अरुण भिंगारे, संदीप कदम, गणेश बोठे, ऋषीकेश कदम, गणेश भिंगारे, निलेश कदम, अनुराग येवले, बाळासाहेब भिंगारे, सुभाष शिंदे, रामदास मोरे, बाळनाथ जोरवर, धोंडीबा सांगळे, जयराम सांगळे, बद्रीनाथ सांगळे, शालिनी सांगळे, प्रभाकर आव्हाड, रमेश उगले, संतोष दवंगे, धनंजय बडदे, कांतीलाल खोंड, मुकेश चंद्रे, राजकुमार दवंगे, किरण उगले, अनिता उगले, भानुदास भवर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सोसायटयामार्फत कृषी पतपुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो त्याच्या वसुलीसाठी सचिव व संबंधीत संचालकांनी प्रयत्न करावेत. त्या थकबाकीत गेल्या तर त्यातून छोट्या- छोट्या घटकांना त्याचा फटका बसतो. सहकारी संस्थांनी आर्थीक उत्पन्नाचे स्त्रोत शोधुन त्यावर काम करावे त्यातुन स्थानिक नेतृत्वाचा विकास होतो. केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजना थेट ग्रामपंचायत स्तरावर येत असल्याने सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी आपापल्या गावांची कामगिरी नावलौकीकास्पद कशी होईल यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com