निळवंडे पाणी योजनेचा आम्ही पाया रचला त्याचा आमदारांनी कळस करावा - कोल्हे

निळवंडे पाणी योजनेचा आम्ही पाया रचला त्याचा आमदारांनी कळस करावा - कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Koparagv

कोपरगाव (Kopargav) शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (question of drinking water) कायमस्वरूपी सुटावा यासाठी तत्कालीन आ. स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी निळवंडे (Nilwande) कोपरगाव अशी 260 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना मंजूर करून आणली. भले आम्ही त्याचा पाया रचला असेल तर त्यावर आमदारांनी (MLA) कळस चढवून श्रेय घ्यावे, आम्ही त्यांना साथ द्यायला तयार असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे (District Co-operative Bank Director Vivek Kolhe) यांनी केले.

विवेक कोल्हे (Vivek Kolhe) म्हणाले, कोपरगाव शहर (Kopargav City) पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासह तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तो सुटावा म्हणून तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे (then MLA Snehalta Kolhe), संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे (Bipin Kolhe) यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यरत आहोत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या विचारांचे शासन राज्यात सत्तारुढ आहे. त्या माध्यमातून त्यांनी काम करायला हवे. ते म्हणतील तिथे आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत.

उलट आम्ही त्यांना एकदा नव्हे तर दोनदा आवाहन केले होते. पण त्यावर त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. काल-परवा डाऊच येथील कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनीच या भूमिकेला छेद देत गट-तट विसरून विकासासाठी एक व्हा असे आवाहन केले होते. त्यांचे हे आवाहन म्हणजे देर आये दुरुस्त आये असेच आहे. शहराच्या पाण्यासह अन्य प्रश्नावर आपण लोकप्रतिनिधींना सहकार्य करण्याची भूमिका घेऊ भलेही त्याचे श्रेय त्यांनीच घ्यावे असेही विवेक कोल्हे म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com