अहमदनगर l प्रतिनिधी

जिल्हा बँकेवर कोपरगाव येथून विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

कोपरगाव सोसायटी मतदार संघातील अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे समर्थकानी माघार घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झाले.

काळे व कोल्हे जिल्हा बँक निवडणुकीत थोरात गटाचे समर्थक आहेत. कालच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आ.काळे व माजी आ.स्नेहलता कोल्हे भेटीसाठी संगमनेर येथे गेल्या होत्या. तेव्हाच या मतदार संघातील निर्णय झाल्याचे मानले जात होते.

विवेक कोल्हे यांच्या रूपाने कोल्हे परिवाराच्या तिसऱ्या पिढीचा बँकेच्या राजकारणात संचालक म्हणून प्रवेश होत आहे.

सहकारातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू असलेले विवेक इफकोचे संचालक तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आहेत.

बुधवारी कोपरगाव सोसायटी मतदारसंघात बिपीनदादा कोल्हे, किसनराव पाडेकर व देवेंद्र रोहमारे यांनी माघार घेतली. अलकादेवी जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी माघार घेतली होती.