कोपरगाव तालुक्याला पुरेसे इंजेक्शन मिळावेत

विवेक कोल्हे यांची जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे मागणी
कोपरगाव तालुक्याला पुरेसे इंजेक्शन मिळावेत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, त्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोपरगाव तालुक्याकरीता रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेसे इंजेक्शन मिळावे व कोपरगाव तालुक्याच्या बाबतीत अन्याय होऊ नये, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक बिपीन कोल्हे यांनी जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांचेकडे केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वैद्यकीय सेवा अपुर्‍या पडत आहेत. उपलब्ध कोव्हिड सेंटरमध्ये असलेल्या बेडच्या संख्येची कमतरता असून कोपरगाव तालुक्यासाठी पुरविण्यात येणारी रेमडेसिवीर इंजेक्शनची संख्याही रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात मिळत आहे.सध्या शहरातील सर्वच कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिवीरची मागणी होत आहे.इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्यावर इंजेक्शन शोधण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आलेली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनकरिता नेमणूक असलेले नोडल अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त श्री. कातकडे यांची भेट घेत श्री. कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्याला रुग्णसंख्येच्या तुलनेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसून कोपरगाव तालुका हा जिल्हा आकडेवारीत प्रथम पाच तालुक्यांच्या यादीत असल्याने त्या तुलनेत रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे असे निदर्शनास आणून देत तालुक्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा करण्याची मागणी केली. त्यानुसार श्री. कदम व श्री. कातकडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोपरगावसाठी रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याचे आश्वासित केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com