सामुदायिक विवाह सोहळयात वधु-वरांना मनी मंगळसुत्र, सुरुची भोजन व संसारोपयोगी साहित्य देणार

सामुदायिक विवाह सोहळयात वधु-वरांना मनी 
मंगळसुत्र, सुरुची भोजन व संसारोपयोगी साहित्य देणार

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

संजीवनी उद्योग समुह, संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि माजीमंत्री शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी 27 मे 2022 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असुन यात सहभागी जोडप्यांना मोफत मनी-मंगळसुत्र, संसारोपयागी साहित्य आणि विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार्‍या वर्‍हाडी मंडळींना सुरूची भोजन देण्यात येणार असुन इच्छुकांनी जास्तीत जास्त नांव नोंदणी तात्काळ करावी अशी माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगांव येथे सर्वधर्मिय विवाह सोहळयाचे दरवर्षी आयोजन केले जाते. मात्र करोना आपत्तीमुळे गेल्या दोन वर्षापासुन त्यावर मर्यादा आल्या होत्या. आता मात्र या परिस्थितीत सुधारणा होत असल्याने चालु वर्षी 27 मे रोजी होणार्‍या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाची सध्या जय्यत तयारी सुरू असुन या विवाह सोहळयात सहभागी झालेल्या वधु वरांसोबतच्या वर्‍हाडी मंडळींना सुरूची भोजनाची व्यवस्था केली आहे. तरी इच्छुक वधु वरांनी जास्तीत जास्त संख्येने या विवाह सोहळयात सहभागी व्हावे जेणेकरून पुढील व्यवस्था करणे सोईचे होईल असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.