‘पुरातत्व’ने 31 जुलैपर्यंत आराखडा मंदीर समितीकडे सादर करावा

विधान परिषद उपसभापती गोर्‍हे यांचे निर्देश
‘पुरातत्व’ने 31 जुलैपर्यंत आराखडा मंदीर समितीकडे सादर करावा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

लाखो वारकरी सांप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून (Department of Archeology) स्ट्रक्चरल ऑडिट (Structural audit) करून डिपीआर (DPR) तयार करण्यात येणार आहे. मंदीराचे मुळ स्वरुप कायम राखून तो आराखडा मंदीर समितीकडे 31 जुलैपर्यंत सादर करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे (Deputy Speaker of the Legislative Council Nilam Gorhe) यांनी निर्देश दिले.

विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीकडून करण्यात येणार्‍या कामांबाबत तसेच पुरतत्व विभागाकडून तयार करण्यात येणार्‍या आराखड्याबाबत संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस नगराध्यक्षा साधना भोसले, मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पुरातत्व विभागाचे वाहने, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह मंदीर समितीचे सदस्य उपस्थित होते.

उपसभापती गोर्‍हे म्हणाल्या, भारतीय पुरातत्व विभागाने तयार केलेला आराखडा मंदीर समितीला सादर केल्यानंतर मंदीर समितीने अधिकारी, इतिहासकार, संस्कृतचे अभ्यासक यांच्याशी चर्चा करून मते जाणून घ्यावीत. आराखडा तयार झाल्यानंतर आपतकालीन व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता याबाबत बैठका घेऊन चर्चा करावी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे विधी व न्याय विभागाच्या अखत्यारित आहे. या आराखड्यावर शासन योग्य तो निर्णय घेईल असे त्यांनी यावेळी सांगितले. नामसंकीर्तन साभागृहासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. तर शेगावच्या धर्तीवर सुशोभित असे, उद्यान पंढरपुरात तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, तसेच पालखी मार्गावर आवश्यक ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था व माहिती फलक लावावेत, अशा सूचनाही उपसभापती गोर्‍हे यांनी यावेळी दिल्या

यावेळी उपसभापती गोर्‍हे यांनी संत नामदेव पायरी, चोखमेळा समाधी, दर्शन मंडप, स्काय वॉक, आमदार फंडातून बांधण्यात येणार्‍या इमारतीची पाहणी करुन संबधित अधिकार्‍याकडून याबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. नगरपालिकेच्या नामसंकिर्तन सभागृह व पोलीस प्रशासनाकडून वारी कालावधीत बसविण्यात येणार्‍या सीसीटीव्ही बाबतचा प्रस्ताव आढावा घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी शंभरकर यांना यावेळी सांगितले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीरांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्‍या आराखड्याचे सादरीकरण व माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी यावेळी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com