चोरीला गेलेले विरभद्र मंदिराचे अलंकार देवस्थानच्या ताब्यात

ग्रामस्थांनी केले पोलिसांचे अभिनंदन ; युवकांनी सव्वा किलो चांदीच्या पादुका केल्या अर्पण
चोरीला गेलेले विरभद्र मंदिराचे अलंकार देवस्थानच्या ताब्यात

राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता येथील विरभद्र देवस्थानचे चोरी गेलेले चार लाखाचे दागीने पोलिसांकडून देवस्थानकडे सुपर्त केल्याने

भाविकांत आनंद झाला तर युवकांनी नविन चांदीच्या अर्पण केलेल्या पादुकाही आज विधीवत पुजा करून देवतेसमोर बसविण्यात आल्या.

विरभद्र मंदिरात 15 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चोरी होऊन अज्ञात दोन चोरट्यांनी मंदिरातील देवतांच्या मुर्तीवरील चार लाख रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले होते याचा तपास अवघ्या दोन दिवसात लाऊन एक चोरटा व एका सोनारास पोलिसांनी ताब्यात घेऊन तो मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे अन्वेषण विभाग व राहाता पोलिसांना यश आले होते.

जप्त केलेले देवतांचे सुवर्ण अलंकार देवस्थानच्या ताब्यात देण्याचा राहाता न्यालयाच्या आदेशावरून राहात्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी विरभद्र देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ व सचिव अरविंद गाडेकर यांच्या स्वाधीन केले. यावेळी देवस्थानच्यावतीने पोलिसांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. जप्त केलेल्या दागिन्यांची मोडतोड झाल्याने हे सर्व दागिने वितळून त्याचे पुन्हा अलंकार बनविले जातील, असे देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले.

देवाच्या दागिन्यांची चोरी झाल्यानंतर शहरातील मोठ्या संखेने दानशुर भक्तांनी पुढे येत देवाचे दागीने नविन बनवून देण्याचा संकल्प केला यासाठी मोठी चढाओढ लागली होती. त्यानुसार विरभद्र देवता, शंकर पार्वती असे तिन मुकूट तसेच दोन चांदीच्या पादुका तयार करून देण्याची जबाबदारी युवकांनी घेतली तसेच असंख्य भाविकांनी यात आपले योगदान दिले. यापैकी आज ग्रामदैवत विरभद्र महाराजांना राहाता शहरातील काही युवकांनी चांदीच्या पादुका अर्पण केल्या आहेत. 1400 ग्रॅम वजनाच्या या पादुकांचे ग्रामपुजारी अनंत शास्री लावर यांचे हस्ते विधिवत पूजन करून स्थापित करण्यात आल्या. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ, गणेश जेजूरकर, प्रशांत गाडेकर, गणेश बोरकर, प्रविण सदाफळ, संतोष सदाफळ, साकुरीचे उपसरपंच सचिन बनसोडे, गोकुळ मोगले, आनंद शहा, गणेश बोरकर, संतोष सदाफळ, आण्णा लांडबिले, सुरेश डांगे, अमित गाडेकर, अरविंद गाडेकर, मंदिराचे पुजारी भगत, अन्वर सय्यद तसेच देवकर ज्वेलर्सचे संदिप देवकर आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com