पुणतांब्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात धुमश्चक्री

अनेक गणेश भक्त जखमी; पोलिसात गुन्हा दाखल नाही
पुणतांब्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात धुमश्चक्री

पुणतांबा | वार्ताहार

येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळात किरकोळ कारणावरुन चांगलाच राडा झाला. गणेश भक्तांमध्ये दोन गटात धुमश्चक्री उडाली. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणूकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरिक्षक गायकवाड यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

पुणतांबा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीला गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक देखावे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर सादर करून शांततेच्या मार्गाने सर्व गणेश भक्त गणरायाचे विसर्जन करून अखेरचा निरोप देतात. परंतु शुक्रवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळाच्या सदस्यामध्ये धुमचक्री उडाली.

यात बँडच्या गाडीची तोडफोड करण्यात आली तर बऱ्याचशा गणेश भक्ताना दुखापत झाली. परिस्थित नियंत्रणात आणण्यासाठी सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातवा व पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती देऊन त्यांनी स्वतः मध्यस्थी करत बाद मिटविण्याचा प्रयत्न कला.

विसर्जन मिरवणूक सुरळीत करण्यासाठी व दोन मंडळाचा वाद नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक गायकवाड व त्यांचा फौजफाटा तत्काळ दाखल झाला. सर्व परिस्थिती नियंत्रणात आणून जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलीस उपअधिक्षक संजय सातव हे पुणतांब्यात ठाण मांडून बसल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com