मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

रिपाई नेते अशोक गायकवाडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

तालुक्यातील गिडेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवेघेण्या हल्ल्याची चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराचा शोधे घ्यावा व सदर प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास करावा या मागणीसाठी दि.17 रोजी नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्यासह 10 जणांवर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलिस ठाण्यातील पो.कॉ. प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी दाखल दिलेल्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनदशीर मार्गाने काढलेला हा मोर्चा आहे. सोशल डिस्टनसिंगचे संपूर्ण पालन केलेलं होत. अन्याय होत असताना केवळ रोगराई पसरेल म्हणून अन्याय सहन करणे हे काही मनाला पटत नाही. त्यामुळे अन्याया विरुद्ध संघर्ष केल्याचा आणि गिडेगाव तपासाबाबत घेतलेली भूमिका, त्या मुलीच्या फिर्यादी बाबत विचारलेला जाब याचा पोलिसांना राग आला म्हणून त्या रागातून त्यांनी हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी केला आहे

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com