श्रीरामपुरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बाजार समिती परिसरात पहाटे तोबा गर्दी
श्रीरामपुरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात करोना रुग्णांची वाढती लोकसंख्या असूनही नागरिकामध्ये त्याचे गांभीर्य दिसून येत नाही. बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. येथे असलेल्या सर्वांकडून सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे.

राज्य सरकारने एकीकङे बाजार समितीच्या आवारात गर्दी करण्यास मनाई केली असली तरी नागरिक बाजार समितीच्या बाहेर रस्त्यावर आपले दुकान लावून गर्दी करत आहेत. पहाटे त्यांच्यावर लक्ष ठेवायला व गर्दी कमी करण्यासाठी सांगायला संबधित कोणीच नसते. अनेक ठिकाणी भाजिपाला विक्रेते आणि ग्राहक विनामास्क वावरत असतात.

श्रीरामपूर बाजार समितीच्या बाहेर पहाटे काल भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची एक झुंबड उडाली होती. अशी गर्दी दररोज होत आहे. मार्केट बाहेर विक्रेत्यांची अनेक दुकाने रस्त्याच्या कङेला लावली होती. ग्राहकांची संख्या थोडी जरी वाढली तरीही या भागात वाहतुकीची कोंडी होते. सुरक्षित अंतर राखण्याचा नियमाकडेही नागरिकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. काही विक्रेते रांगेत या, असे सांगत होते, परंतू त्याकडे ग्राहक लक्ष देत नव्हते. उलट ग्राहक खरेदीसाठी घाईगडबड करत असल्यामुळे बाजारात एकच गोंधळ दिसून येत होता. काही ग्राहक लवकर भाजीपाला द्यावा, यासाठी आग्रह धरत होते.

देशात सर्वाधिक करोना रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात होत आहे. राज्यात करोनाची दुसरी लाट आहे. मात्र अनेकजण निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. नगरपालीका प्रशासन व पोलिसांनी याकडेे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.