नियमांचे उल्लंघन केल्याने तीन किराणा दुकाने सिल

तर मटन शॉप व दुकानांवर दंडात्मक कारवाई
नियमांचे उल्लंघन केल्याने तीन किराणा दुकाने सिल
File Photo

राहाता |प्रतिनिधी| Rahata

कोविड नियमावलीचे पालन न केल्याने राहाता नगरपरिषदेच्या भरारी पथकाने शहरातील विविध ठिकाणी दुकाने सिल करत काही दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात 5 मटन विक्रेत्यांवर दंडात्मक, 3 किराणा दुकान पुढील आदेशापर्यंत सिल तर दोन किराणा दुकानांवर 6 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नगरपालिकेने ठरवून दिलेल्या कालावधीत रॅपिड अँटीजेन टेस्ट न केल्याने लोकरुचीनगर भागातील एका मेडीकल कर्मचार्‍यास 500 रुपये दंड करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे नियम तोडल्याने शहरातील त्रिशूलनगर मधील 2 किराणा दुकान, गावठाण हद्दीत 3 किराणा दुकान तसेच मटन मार्केट मधील 5 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी कोविड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन व्यापारी वर्गाला केले आहे. कारवाई पथकात कार्यालयीन अधिक्षक नवनाथ जगताप, दिलीप दुशींग, दिलीप सोनवणे, नंदकुमार सदाफळ, केशव बोठे, विठ्ठल ताठे आदींचा समावेश होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com