गॅस पाईपलाईन कामात नियमांचे उल्लंघन

न्यायालयाच्या नोटीसा
गॅस पाईपलाईन कामात नियमांचे उल्लंघन

नेवासा |तालुका वार्ताह| Newasa

नगर-औरंगाबाद महामार्गावर सुरु असलेले गॅस पाईपलाईनचे काम नियम व अटींचे पालन न करता होत असल्याची जनहित याचिका नेवासा येथील वकीलांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली असून त्यावरुन न्यायालयाने गॅस पेट्रोलियम मंत्रालय सेक्रेटरी सह अन्य संबंधीतांना नोटीसा काढल्या असून 29 नोव्हेंबर रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला आहे.

अ‍ॅड. सुदाम ठुबे, अ‍ॅड. बी. एस. टेमक, अ‍ॅड. व्ही. टी. नवले व अ‍ॅड. बन्सी सातपुते यांनी अ‍ॅड. गणेश गाडे यांचेमार्फत ही याचिका दाखल केली आहे. पाच फूट जमिनीत खोदकाम न करता तसेच नियम व अटीचे पालन न करता गॅस पाईपलाईनचे काम सुरु आहे. त्यामुळे एका अभियंत्याला जीव गमवावा लागला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती आर. एन. लड्डा व न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला या दुहेरी खंडपीठाने यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालय सेक्रेटरी, भारत गॅस रिसोर्सेस बोर्ड, अहमदनगर व औरंगाबादचे जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथॉरिटी यांना नोटीस काढली असून 29 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून खंडपीठ पुढे काय आदेश देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com