करोना नियमांचे उल्लंघन : पाच लाखाचा दंड वसूल

पाच हजार नगरकर बेशिस्त । दुकानांना सील
करोना नियमांचे उल्लंघन : पाच लाखाचा दंड  वसूल

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या 5 हजार नगरकरांवर महापालिकेने दंडाचा दंडुका उगारला आहे. महापालिकेच्या पथकाने आतापर्यंत बेशिस्त नगरकरांकडून 5 लाखाचा दंड वसूल केला आहे.

दुकाने सुरू करण्याला बंदी असतानाही चोरीन ती सुरूच ठेवली. महापालिकेच्या पथकाने आज शहरातील चार किराणा दुकानदारांना दंड करत ती सील केली. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून महापालिकेच्या पथकाने आतापर्यंत पाच लाख रूपयांचा दंड वसुल केला आहे. दक्षता पथक प्रमुख नजान यांनी ही माहिती दिली.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत नगर शहरात 5 लाख 30 हजार 200 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या चार पथकांनी ही कारवाई केली.

महापालिकेचे प्रमुख अधिकारी परिमल निकम, कल्याण बल्लाळ, संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखालील राहुल साबळे, सूर्यभान देवगडे, आनंद कुमार नेमाने, राजेश आनंद, किशोर जाधव यांनी आतापर्यंत 489 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

मास्क न वापरणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे नागरिक, दुकानदार यांच्यावर ही कारवाई केली आहे. 16 मार्च पासून सुरू झालेल्या कारवाईत 5 हजार 49 बेशिस्त नगरकरांकडून सुमारे 5 लाख 30 हजारांचा दंड पथकाने वसूल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com