पोलिसांशी हुज्जत घालणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

दोघांकडून करोना नियमांचे उल्लंघन
पोलिसांशी हुज्जत घालणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) / Pathardi - करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणार्‍या पथकाशी व पोलीस निरीक्षकांबरोबर अरेरावी करून हुज्जत घालणार्‍या दोघा विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शनिवार व रविवार पाथर्डी तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येतो. करोनाचे नियम मोडणार्‍या विरोधात नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्त कारवाईची मोहीम आखली. शनिवारी संपूर्ण शहरात पथकाकडून विना मास्क फिरणारे, सुरक्षीत अंतर न ठेवणारे व नियमबाह्य दुकाने उघडी ठेवणार्‍या व्यापार्‍यांवर पथकाकडून कारवाई केली जात होती.पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण मोहिमेत सहभागी झाले होते.

शेवगाव रोड वरील मोरया बिल्डिंग समोर विना मास्क फिरणार्‍या दोघांना पोलिसांनी दंड भरण्यास सांगितला. मात्र, आम्ही आदेश मानत नाहीत,दंड भरणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असा वाद घालून पोलिसांशी अरेरावी करून हुज्जत घातली. याप्रकरणी लक्ष्मण धोंडीराम पवार यांच्या फिर्यादीवरून संकेत लक्ष्मण बोरुडे व अक्षय लक्ष्मण बोरुडे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com