सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; गुन्हा दाखल

छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांचे विरोधात राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; गुन्हा दाखल

राहाता l प्रतिनिधी

तहसिल मधील बंदिस्त असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आश्वारूढ पुतळा मुक्त करुन सदर पुतळा शिवाजी चौकात (Shivaji Chauk) उभारावा अशी मागणी करत छावा क्रांतिवीर सेनेने (Chhava Krantiveer Sena) आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; गुन्हा दाखल
बंदिस्त असलेला पुतळा मुक्त करावा या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे उपोषण

उपोषण स्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. उपोषण स्थळी सभा घेतल्याने राहाता पोलिस ठाण्यात (Rahata Police Station) आयोजक विश्वनाथ वाघ यांचेवर भा.द.वि कलम १८८ , २६९ , २७१ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ ( ब ) व म.पो. अधि.१९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पो.नि.सुभाष भोये यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com