अनेक गावांत प्रत्येक कुटुंबाला मिळणार नळजोडणी!

अनेक गावांत प्रत्येक कुटुंबाला मिळणार नळजोडणी!
पाणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीच्या नळ पाणी परवठा योजनेच्या 81 कोटी 68 लाख 21 हजार रूपये ढोबळ किमतीच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे. यापूर्वीही नगर जिल्ह्याती अनेक नळपाणी पुरवठ्याच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाने या कामांना वेग येेणार असून जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार आहे.

राहुरी तालुक्यातील सोनगाव-धानोरे येथील 55 लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या 20 कोटी 36 लाख 62 हजार रूपये इतक्या ढोबळ किमतीच्या अदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

मुसळवाडी व गावे येथील नळपाणी योजनेच्या 16 कोटी 68 लाख 57 हजार रूपयांच्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा व 3 गावे येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या 22 कोटी 76 लाख 52 हजार रूपये किमतीच्या ढोबळ अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

शेवगाव तालुक्यातीलही शहर टाकळी व 24 गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या 40 कोटी 46 लाख 65 हजार ढोबळ अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील जामगाव व 5 गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या 39 कोटी 55 लाख 53 हजार ढोबळ अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या योजनांना मान्यता

घुलेवाडी, सोनगाव-धानोरे, मुसळवाडी व 9 गावे जामगाव व 5 गावे ब्राम्हणवाडा-3 गावे शहरटाकळी व 24 गावे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com