ग्रामसुरक्षा यंत्रणा अ‍ॅप डाउनलोड करुन घ्यावे

राहाता पोलिस ठाण्याचे पो. नि. गायकवाड यांचे नागरिकांना आवाहन
ग्रामसुरक्षा यंत्रणा अ‍ॅप डाउनलोड करुन घ्यावे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा अ‍ॅप डाऊनलोड करावे, व जास्त जास्त लोकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी केले.

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीकामी काल बहुतांशी गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या अ‍ॅप बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यंत्रणेत ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागिय अधिकारी गणेश लोकरे, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे, पोलिस उपनिरीक्षक पगार, गुंजाळ यांचेसह राहाता पोलिस ठाण्याची पोलिस यंत्रणा उपस्थित होती. काल अस्तगाव, रांजणगाव, रामपूरवाडी, पुणतांबा, केलवड, दहेगाव, शिंगवे, कोर्‍हाळे, दहेगाव, साकुरी अदि गावांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण ग्रामस्थांना देण्यात आले.

याप्रसंगी पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड म्हणाले, कोणत्याही गावात रात्री बे रात्री चोरीच्या व अन्य घटना घडतात. ग्रामसुरक्षा यंत्रणेने दिलेल्या नंबरवर तात्काळ कॉल करावा, हा कॉल टोलफ्री आहे. त्या कॉलचा मेसेच त्या गावापासुन 10 किमीच्या परिघात पोहचतो. मात्र कॉल केल्यानंतर व नंतर फोन बंद करु नका, बंद केला तर अडचण येते. म्हणून फोन बंद करु नये. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा तेथे पोहचेल. हे अ‍ॅप सर्व ग्रामस्थांनी डाउनलोड करुन घ्यावे व सर्व ग्रामस्थांनी या यंत्रणेत सहभाग घ्यावा, असे ही श्री. गायकवाड म्हणाले.

यावेळी कॉल कसा करावा? याचे प्रशिक्षण यावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागिय अधिकारी गणेश लोकरे, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे यांनी दिले.

अस्तगाव येथील प्रशिक्षण प्रसंगी सरपंच नवनाथ नळे, उपसरपंच सुरेश जेजुरकर, राजेंद्र महाराज तांबे, संतोष लोंढे, भानुदास गवांदे, गोविंद पुंड, भागुनाथ त्रिभान, बाबासाहेब जेजुरकर, मोरवाडीच्या पोलिस पाटील निता मोरे, राजेश त्रिभुवन, प्रदिप चोळके, तरकसे, भाऊसाहेब नळे, सिताराम जेजुरकर, किसन जेजुरकर, वसंत लोंढे. पिंपळस येथे सरपंच सौ. नंदाताई घोगळ, पोलिस पाटील बाळासाहेब वाघमारे, ग्रामसेवक देशमुख, यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहेगावला माजी सरपंच भगवानराव डांगे, पोलिस पाटील शोभाताई डांगे, सरपंच विठ्ठलराव डांगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पोपटराव डांगे, चंद्रकांत डांगे, आकाश गायकवाड, हर्षल बावके, जिजाबापु गुंजाळ, दिगंबर आरणे, आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com