गावठी दारू हातभट्टीवर राहुरी पोलीसांचा छापा

गावठी दारू हातभट्टीवर राहुरी पोलीसांचा छापा

दोन लाखांची दारू केली नष्ट

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri) धामोरी (Dhamori) येथे 2 लाख रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू (Village Hand Furnace Alcohol) व कच्चे रसायन राहुरी पोलिसांनी (Rahuri Police) नष्ट केले असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

दरम्यान बुधवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुरी पोलीस स्टेशनचे (Rahuri Police Station) पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना धामोरी (Dhamori) शिवारात अवैध हातभट्टीची (Illegal Hand Furnace) दारु बनत असल्याची गुप्त मिळाल्याने पोलीस निरीक्षक दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्‍हेडा, पोलीस हवालदार साईनाथ टेमकर, पोलीस नाईक सुशांत दिवटे, राधिका कोहकडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोषकुमार राठोड, जयदीप बडे, अमोल पडोळ आदींचे पथक पाठविले असता, दोन ठिकाणी छापा (Police Raid) टाकुन एकूण 2 लाख रुपयांची गावठी तयार दारू व रसायन नष्ट (Chemical Destruction) केले आहे.

यावेळी धामोरी येथीलरंभाबाई ताराचंद गिर्‍हे यांच्याकडून 1 लक्ष 15 हजार रूपये किंमतीची तर राजेंद्र मच्छिंद्र गिर्‍हे 85 हजार रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची तयार दारु व कच्चे रसायन मिळून आले. दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ),(क),(ड), (ई) प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल (Filed a Case) केले असून पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साईनाथ टेमकर हे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com