विळद गाव करोनामुक्त

विळद गाव करोनामुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी जबाबदारीने पालन केल्याने आणि ग्रामपंचायतीद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे नगर तालुक्यातील विळद हे गाव करोनामुक्त झाले असल्याची माहिती सरपंच संजय बाचकर यांनी दिली आहे.

विळदमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढता करोना संसर्ग गावाची चिंता वाढविणारा होता. करोनामुळे आप्तस्वकीय गमावल्याने गावातील काही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी गावातील स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि गावातील तरुण स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला तर गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे योग्यरित्या पालन करून करोनाला अखेर गावातून हद्दपार केले. करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांनी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेतले.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिवरेबाजार पॅटर्न राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. त्यानूसार सोमवारी (24 मे) शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विळद ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली.

यावेळी पर्यवेक्षक श्री.गोरे, तलाठी श्री.लोंढे, सरपंच संजय बाचकर, उपसरपंच स्वाती निमसे, ग्रामसेविका सौ. गायकवाड, माजी सरपंच मनीषा बाचकर, कैलास अडसुरे, सागर जगताप, राजेंद्र निकम, अजीज शेख, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रशांत अडसुरे, वनसमितीचे उपाध्यक्ष संतोष अडसुरे, संदीप जगताप, हनीप शेख, विकास शिंदे, बापूसाहेब जगताप उपस्थित होते.

नियमांचे पालन करा -

गावात नव्याने संसर्ग होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे. करोनातून बरे झालेल्यांसह सर्वांनी नियमांचे पालन करावे मास्क, हँड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचे पालन करावे. करोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता ताबडतोड हॉस्पिटलमध्ये जावे, करोना चाचणी करावी. जर करोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर उपचार सुरु करावेत.

- संजय बाचकर, सरपंच

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com