विखे कारखाना कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या

विखे कारखाना कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या

लोणी | वार्ताहर

राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (Padmshri Dr. Vikhe Patil Cooperative Sugar Factories) कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या (Sucide) केल्याची घटना शुक्रवार (दि.९) रोजी सकाळी घडली.

चंद्रसेन तोडकर(वय-५१) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चंद्रसेन यांनी प्रवरानगर (Pravaranagar) येथील आहेर वस्तीवरील (Aher Vasti) शेतातील झाडाला गळफास लावून घेतला. सकाळी ९.३० च्या सुमारास हि घटना घडली.

चंद्रसेन यांनी आपल्या घरातील कपड्यांमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात कार्यालयाचे मॅनेजर आणि काही कर्मचारी आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असून माझ्या मृत्यूला हेच लोक जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

लोणी पोलिसांनी (Loni Police) मृतदेह आणि चिट्ठी ताब्यात घेतली असून पुढील तपास सपोनि समाधान पाटील करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com