माजी आमदारांविरुद्ध गुन्हा का नोंदविला नाही- वहाडणे

माजी आमदारांविरुद्ध गुन्हा का नोंदविला नाही- वहाडणे
विजय वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

ओबीसींना राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) मिळावे यासाठी भाजपाने (BJP) महाराष्ट्रभर रास्ता रोको,चक्का जाम आंदोलने केली. अनेक ठिकाणी आंदोलक व आंदोलक नेत्यांवर गुन्हे दाखल झाले, मात्र कोपरगाव (Kopargav) येथे झालेल्या रास्ता रोकोमुळे नगर-मनमाड हायवे 3 तास ठप्प झाला. वाहने अडकून पडली, प्रवाशांचे हाल झाले. अनेक अवजड वाहने गोदावरीच्या (Godavari) लहान पुलावरून शहरातून वळविली. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला. कोविडमुळे (Covid 19) 144 कलम लागू असतानाही शेकडोंचा जमाव जमविला. जमावबंदीचा भंग केला म्हणून संबंधितांवर गुन्हे (crime) का दाखल केले नाहीत असा सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे (VIjay Vahadane) यांनी केला आहे.

त्यावेळी तहसीलदार (Tahasil), पोलीस निरीक्षकही (PI) उपस्थित होते. त्यांनी कारवाई का केली नाही? आपल्याच जिल्ह्यात त्याचवेळी आंदोलन करणार्‍या आ. मोनिकाताई राजळे यांच्यावर कारवाई झाली. पण कोपरगावचे प्रशासन (Administration of Kopargaon) कोल्हे (Kolhe) यांच्या दबावाखाली काम करते की काय? सामान्य जनतेवर कायद्याचा बडगा उगारणारे अधिकारी कारवाई करायला का घाबरले? अशामुळे स्वतःच्या मस्तीत राजकारण (Political) करणारे जास्तच उंडारतील. प्रशासनाचाही नैतिक अधिकार कमी होतो हे लक्षात घ्या.

अजूनही वेळ गेलेली नाही. संबंधित नेते व जमाव यांच्यावर कारवाई करा. अन्यथा यानंतर मलाही वेगळ्या मार्गाने जावे लागेल. आम्ही प्रशासनाला सहकार्य करायचे व काहींनी कायदे धाब्यावर बसवून करोनाचा धोका असूनही मनमानी करायची हे योग्य नाही. नेत्यांनी बडेजाव स्वतःच्या घरी दाखवावा,सामान्य जनतेचे जीवित धोक्याचे आणू नये, असेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com