जनता संचारबंदी नको असेच जनमत : नगराध्यक्ष विजय वहाडणे

जनता संचारबंदी नको असेच जनमत : नगराध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव भयावह वेगाने वाढतो आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी पुन्हा जनता संचारबंदी करावी की नाही यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव नगरपरिषद येथे बैठक आयोजित केली होती. बैठकीत सध्या जनता संचारबंदी नको असा सूर उमटल्याने तूर्त तरी संचारबंदी करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली.

बैठकीत जनता संचारबंदीमुळे लहान मोठ्या व्यावसायिकांचे होणारे हाल, व्यवसायासाठी वेळ वाढवून देणे, कोव्हिड केंद्रावरील स्वच्छता, बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांबद्दल प्रशासनाला माहिती देणे, कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जागृती करणे इ. विषयांवर चर्चा झाली.

यावेळी इंडियन मेडिकल असोसीएशनचे डॉ. जोर्वेकर, डॉ. तिरमखे, कैलास जाधव, चेतन खुबानी, शरद त्रिभुवन, अकबर शेख, उमेश धुमाळ, शरद खरात, योगेश वाणी, सुशांत खैरे, अंकुश वाघ, सतीश जाधव, धनंजय कहार, गणेश लकारे व पत्रकार बंधू यांनी चर्चेत भाग घेतला.

सविस्तर चर्चा झाल्यानंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले, सद्यस्थितीत जनता संचारबंदी लागू न करता, येणार्‍या काळात जर अजून जास्त धोकादायक पद्धतीने करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र जनता संचारबंदी लागू करावी लागू शकते. यावेळी विजय वहाडणे यांनी करोनाशी रात्रंदिवस लढणार्‍या प्रशासनाचे अभिनंदन केले व यानंतरही प्रत्येकाने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करून उपस्थितांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com