ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका - मंत्री विजय वडेट्टीवार

नारायण गड येथील मेळावा
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका - मंत्री विजय वडेट्टीवार

खरवंडी कासार |वार्ताहार| Kharwandi kasar

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी एनटी, व्हीजे एनटी, संघटनांचा पाठिंबाच आहे,

परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावल्यास परिणामी मंत्रिपदाचा त्याग करुन रस्त्यावर उतरून ओबीसी समाजासाठी लढाई करू, असे प्रतिपादन पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी एनटी, व्हीजे, एनटी परिषद मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र हद्दीवरील नारायण गड येथील मेळाव्याप्रसंगी केले.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. भाजप सरकारने मराठा समाजास नोकरी आणि शिक्षणात इएसबीसी सवलती 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर घटनेप्रमाणे 52 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती देण्यात आली.

2019 विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर तीन पक्षांचे मविआ आघाडी सरकार सत्तेत आले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकावे यासाठी मराठा आरक्षण अभ्यास समिती गठीत करून घटनातज्ञांकडून मराठा समाज आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, असे अहवाल घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मविआ आघाडी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी ओबीसी समाजाचे नेते व जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, आमदार राजेश राठोड, कल्याण काळे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, नारायण मुंडे, बंजारा समाजाच्या नेत्या साधना राठोड, ओबीसी संघटनेचे बबनराव तायवाडे, चंद्रकांत बावकर, जनार्दन तांडेल, बालाजी शिंदे, अरुण खरमाटे, अशोकराव जिवतोडे, सचिन राजूरकर, मच्छिंद्र भोसले, बाळासाहेब पांचाळ, डॉ. बी. डी. चव्हाण, आनंद लहामगे, रमेश सानप, बाबासाहेब वाघ, प्रल्हाद किर्तने, विजय राठोड, लहु दराडे, गणेश किर्तने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केले तर आभार बाबासाहेब वाघ यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com