Video : मुळा नदीवरील केंदळ-मानोरी पूलाचे काम तात्काळ मार्गी लावा, अन्यथा आंदोलन

केंदळ ग्रामस्थांचा इशारा

आरडगांव | वार्ताहर

राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मानोरी-केंदळ मुळा नदीवरील जीर्ण झालेल्या पूलावरून धोकादायक वाहतूक सुरूच असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संमधीत विभागाने तात्काळ याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा केंदळ येथील ग्रामस्थानी दिला आहे.

मानोरी-केंदळ खुर्द- केंदळ बृ.,चंडकापुर (ता.राहुरी) आदी गावांना जोडणारा मुळा नदीवरील बंधा-या समोरील पूल हा गेल्या अनेक दिवसापासून जीर्ण झाला आहे. सदर पूलाची मर्यादा देखील अनेक दिवसांपासून संपलेली आहे. त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळला आहे तर हा पुल देखील अंतिम टप्प्यात कोसळण्याच्या स्थितीत आहे. तरीदेखील या ठिकाणाहून धोकादायक वाहतूक हि सुरूच आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. येथील ग्रामस्थांनी संमधीत विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. तरीही अद्याप या ठिकाणी नवीन पूल होत नसल्याने नागरीकांनी एकञ येत तात्काळ या ठिकाणी नवीन पूलाची बांधणी करावी अन्यथा आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा येथील सरपंच मच्छिंद्र आढाव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव, मा.सरपंच संदीप आढाव,सोसायटीचे चेअरमन राजेंद्र आढाव,बाबासाहेब भोईटे, अनिल आढाव, पंढरीनाथ आढाव, शिवाजी गुंजाळ(सर), शिवाजी आढाव, रामदास तोडमल, बाळासाहेब आढाव, मधुकर मगर, वैभव जरे, सचिन जरे,भाऊसाहेब आढाव आदींसह केंद्र खुर्द येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com