राहुरी | Rahuri

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ते मुसळवाडी रस्त्यावरील

रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी साठल्याने हा भुयारी मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे.

दरम्यान टाकळीमिया ते मुसळवाडी रस्त्याच्या रेल्वेचे गेट बंद करून वाहतूकीसाठी भुयारी बोगदा तयार करण्यात आला.

सध्या मुळाच्या डाव्या कालव्याला आवर्तन सुरू असल्याने या भुयारी बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून साठले आहे. रेल्वे प्रशासनाने कालव्याचे व पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी विद्युत मोटार पंप बसविले आहे.

मात्र सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या विजबिल वसुली मोहिमेमुळे या भागातील रोहित्र बंद केले आहे. त्यामुळे मोटार पंप बंद झाल्याने बोगदा पाण्याने भरला आहे. हा बोगदा तालुक्याच्या पुर्व भागातील गावांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.