Video : शनिशिंगणापूर पुन्हा गजबजले

शिंगणापुरात तीन हजार भाविक
Video : शनिशिंगणापूर पुन्हा गजबजले

शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shanishignapur

शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर गुरुवारी पहाटेच्या आरतीनंतर भाविकांसाठी खुले झाले. दिवसभरात सुमारे तीन हजार भाविकांनी दर्शन घेतले.

मंदिर खुले झाल्याने शिंगणापूर पुन्हा गजबजले. सर्वत्र गाळे धारकांनी आपापली दुकाने सज्ज केली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली आहे. प्रत्येक ठिकाणी कर्मचारी दक्ष असल्याने शनिदर्शन अंतर ठेऊन भाविक घेत आहेत. मंदिर बंद असल्याने सर्व काही ठप्प झाले होते. भाविकांना करोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने चौथर्‍याखालून दर्शन घेण्याची शासनाने परवानगी दिली असल्याने भाविकांनी चौथर्‍याखालून दर्शन घेतले.

राहुरी ते शनिशिंगणापूर रस्ता अद्यापही पूर्ण झाला नसल्याने भाविकांमधून प्रचंड नाराजी दिसून येते. या रस्त्यांचा कडेला रसवंती चालक त्याचप्रमाणे छोटे-मोठे हॉटेलचालक यांचा धंदा दोन वर्षापासून बंद असल्याने या रस्त्याचे काम होणे गरजेचे होते मात्र चार वर्ष झाले तरी हा रस्ता पुर्ण होऊ शकला नाही. मंदीर खुले झाल्याने भाविकांबरोबर ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

नियमांचे उल्लंघन करू नये

सध्या करोनाचा पार्श्वभूमीवर शनिदर्शन बंद करण्यात आले होते. आता मंदिर खुले झाल्याने भाविकांची गर्दी होणार असून सर्व भाविकांनी काटेकोर नियमांचे पालन करून शनिदर्शन घ्यावे.

-जी. के. दरंदले कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान

Related Stories

No stories found.