Video : जिरायती टापूत तासभर जोरदार पाऊस

आडगाव, पिंप्री लोकई, पिंप्रीनिर्मळचा पश्चिम भाग, केलवाडचा दक्षिण भाग झोडपला

अस्तगांव l वार्ताहर l Astgoan

राहाता (Astgoan) तालुक्यातील पश्‍चिम भागातील आडगाव (Aadgoan) भागात काल सायंकाळी ५ नंतर तासभर जोरदार पाऊस (Heavy rain) झाला. यामुळे त्या भागातील शेतकर्‍यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे.

पावसाळी वातावरण (Rainy weather) नसताना सायंकाळी ढग अचानक जमा झाले. व ५ वाजेनंतर जोरदार पाउस सुरु झाला. या पावसाने जिरायती टापुतील शेताच्या बांधणी तुंबल्या आहेत. अर्थात या पावसाने धरसोड केली. एकाच गावात काही भागात बरसला तर काही भागात हुलकावणी दिली.

काल आडगाव (Aadgoan) भागात तसेच पिंप्री लोकई (Pimpri Lokai) गावात पावसाने हजेरी लावली. शेजारील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील कसारे (Kasare), लोहारे (Lohare) भागातही जोरदार पाऊस झाला. आडगाव भागा शेजारील केलवड (Kelwad) येथील दक्षिण भागात पाऊस झाला. तर पिंप्रीनिर्मळ (Pimpri Nirmal)च्या पश्‍चिम भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पिंप्रीलोकई भागात चांगला पाऊस झाला. पिंप्रीलोकईच्या उत्तर भागात पाऊस नाही. असे तेथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गाडेकर (Balasaheb Gadekar) यांनी सांगितले. शेजारील गोगलगावलाही (Gogalgoan) चांगला पाऊस झाला. काही गावात काही भागातच पाऊस झाला. इतर क्षेत्राला मात्र हुलकावणी दिली.

केलवड गावा पासुन तीन किमी अंतरावरील आडगाव च्या दिशेला केलवड च्या हद्दीत पाऊस झाला, अशी माहिती प्रगतशील शेतकरी विठोबा राऊत (Vithoba Raut) यांनी दिली. आज 6 जुलै पासुन सर्वदूर पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Meteorologist Punjabrao Dak) यांनी व्यक्त केला आहे.

गोदावरीत पाणी!

काल गोदावरी (Godavari river) वरील नांदुरमधमेश्‍वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍यातुन गेट ची चाचणी घेण्यासाठी तासभर गोदावरी नदीत (Godavari river) पाणी सोडण्यात आले. सर्व गेट मधुन हे पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीत तासभर पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला. हे पाणी नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातील साठलेले पाणी होते. या बंधार्‍यांच्या भागात गेल्या आठ दिवसापासुन पाउस नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com