Video : राहुरी तालुक्यात खतांसाठी शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा

महिला शेतकऱ्यांनाही रांगेत उभे राहण्याची वेळ

राहुरी | प्रतिनिधी

राहुरी तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले. तर कालपासून आद्रा नक्षत्र सुरू झाले आहे. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र आता उगवण झालेल्या पिकांना खतांची गरज भासू लागली आहे.

खतासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खतांच्या दुकानासमोर भल्या पहाटे येऊन लांबलचक रांगा लावल्या आहेत. त्यात महिला शेतकऱ्यांनाही रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. मात्र एवढा आटापिटा करूनही राहुरी तालुक्यात खतांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात नाराजीच पडत आहे. राहुरी व देवळाली प्रवरा येथे शेतकऱ्यांना खतांसाठी तारेवरची कसरत करावी लागते. खतांचा मर्यादित साठा, कृत्रिम टंचाई आणि काळ्या बाजारामुळे खते दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

पावसाअभावी पिकांना जीवदान देण्याचे कसब साधताना खतांच्या टंचाईला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून करोना महामारीत गर्दी करताना शेतकऱ्यांच्या जिवावर बेतणार आहे. याबाबत कृषी व महसूल प्रशासन मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवत असल्याने शेतकऱ्यांचा तिळपापड झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com