Video : आरडगाव-केंदळ रस्त्याची दुर्दशा; वृक्षारोपण करत गांधीगिरी

Video : आरडगाव-केंदळ रस्त्याची दुर्दशा; वृक्षारोपण करत गांधीगिरी

आरडगांव | वार्ताहर

आरडगाव-केंदळ रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांनी रस्त्यावर वृक्षारोपण करत गांधीगिरी आंदोलन करून आरडगाव सबस्टेशन येथे रस्ता खोदून रस्ता बंद केला जाईल असा इशारा दिला आहे.

राहुरी तालुक्यातील पुर्वभागत दळणवळणाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जाणारा आरडगांव ते केंदळ रस्त्यावर मोठमोठले खड्डे पडुन दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणे मुश्कील झाले आहे. केंदळ-मानोरी रस्त्यावरील पुल तुटल्याने आमचा येण्याजाण्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी केंदळ बुंद्रुक व आरडगांव येथील ग्रामस्थांनी अनोख्या पध्दतीने गांधीगिरी आंदोलन केले आहे.

यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही तर यानंतर रीतसर तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन शनिवार दि.२५ सप्टेंबर रोजी आरडगांव सबस्टेशन येथे मुख्य रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदुन बंद करण्यात येईल असा इशारा विशाल तारडे, हरिभाऊ डोंगरे, अविनाश यादव, सोमनाथ भांड, अच्युतराव बोरकर, जनार्दन तारडे, बापू भुशे, पोपट तारडे, कृष्णा तारडे, बालु भुशे, नवनाथ कैतके, चंद्रकांत तारडे, गणेश भांड, समीर तारडे, महेंद्र तारडे, रामेश्वर तारडे, ज्ञानदेव तारडे, संदीप पवार, रामेश्वर कैतके, उत्तम राऊत, सुनील भापकर, नामदेव कैतके, कचरू आढाव, सचिन धसाळ यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com