Video : राहुरी तालुक्यात ढग फुटी सदृश पाऊस, ओढेनाले तुडूंब, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान

Video : राहुरी तालुक्यात ढग फुटी सदृश पाऊस, ओढेनाले तुडूंब, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान

राहुरी | Rahuri

तालुक्‍यातील काही ठिकाणी ढग फुटी सदृश पाऊस झाला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे.

तालुक्यातील मल्हारवाडी, बारागाव नांदूरसह अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे. हावरीच्या ओढ्याला मोठा पूर आल्याने नांदूरचा राहुरीशी संपर्क तुटला आहे.

टाकळीमिया परिसरात ६७ मी.मी पावसाची नोंद झाली असून ओढे-नाले फुल्ल होऊन शेतात पाणी शिरल्याने शेतकर्‍यांचे कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

तसेच या ढग फुटी सदृश पावसाने चिंचविहीरे परिसरात ओढेनाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.