VIDEO : उसाच्या फडात आढळली पाच पिल्ले! बिबट्याचे की...., शेतकरी संभ्रमात

VIDEO : उसाच्या फडात आढळली पाच पिल्ले! बिबट्याचे की...., शेतकरी संभ्रमात

आरडगांव | वार्ताहर

राहुरी तालुक्यातील माहेगांव महाडुकसेंटर परिसरात उसाच्या फडात उस तोडणी कामगारांना पाच पिल्ले आढळून आल्याने उस तोडणी कामगार व शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडीओ : राजेंद्र आढाव

दरम्यान या घटनेची महिती वनविभागाला देताच तत्काळ वनविभागाचे गोरक्षनाथ मोरे यांनी पाहणी केली. मात्र हे बिबट्याचे पिल्ले नसून हे दुसऱ्या जातीचे आहेत असे त्यांनी सांगितलं. त्यामुळे येथील शेतकरी व उस तोडणी कामगार हे संभ्रमात पडले आहे. तातडीने वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com