व्हिडिओ कॉलिंगव्दारे तरूणीसोबत गैरवर्तन

गुन्हा दाखल
व्हिडिओ कॉलिंगव्दारे तरूणीसोबत गैरवर्तन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी (Savedi) उपनगरातील एका तरुणीला तिच्या फेसबूक अकाऊंटवर (Facebook Account) एका व्यक्तीने महिलेच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत त्यावर व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) करून गैरवर्तन केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओ कॉलिंगव्दारे तरूणीसोबत गैरवर्तन
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाचा खून

20 फेब्रुवारीला तरुणीच्या फेसबुकवर एका महिलेच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. 24 फेब्रुवारीला तिने ती स्वीकारली. त्यानंतर 25 फेब्रुवारीला दुपारी त्या अकाऊंटवरुन मेसेज आला. तरुणीने तिला रिप्लाय केल्यावर समोरील व्यक्तीने व्हीडीओ कॉल केला. चेहरा अस्पष्ट ठेवत एका अज्ञात पुरुषाने तिच्याशी अश्लिल संभाषण करत गैरवर्तन केले. जिवे ठार मारुन टाकील, अशी धमकी (Murder Threat) दिली. त्यानंतरही वारंवार कॉल व मेसेज केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

व्हिडिओ कॉलिंगव्दारे तरूणीसोबत गैरवर्तन
कोपरगाव उपकारागृहात शस्र पुरवताना एकास अटक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com