Video : कोपरगावमध्ये भाजप-शिवसेनेचे मटका फोडून आंदोलन

कोपरगाव l तालुका प्रतिनिधी

कोपरगाव शहराला नगरपालिकेच्या (Kopergoan Nagarpalika) वतीने आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा (Water supply) करण्याच्या निर्णयाला विरोध करत मटका फोडून नगराध्यक्ष व आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांचा निषेध करत घोषणाबाजी देत भाजपा- शिवसेनेच्या (BJP-Shivsena) वतीने आंदोलन पालिकेत करण्यात आले आहे.

यावेळी भाजपा नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, रवींद्र पाठक, कैलास जाधव, दत्ता काले, ऐश्वर्या सातभाई, विद्या सोनवणे, वैशाली आढाव, विजय आढाव, शिवाजी खांडेकर, विनोद राक्षे, जितेंद्र रनशूर, अशोक लकारे, हर्षदा कांबळे, मंगला आढाव, वैशाली सोनवणे, योगेश बागुल, ताराबाई जपे, पिंकी चोपडा, दीपा गिरमे, दिनेश कांबळे, शिल्पा रोहमारे, रवींद्र रोहमारे, सत्यंन मुंदडा, महावीर दगडे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com