VIDEO : कोपरगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन

VIDEO : कोपरगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

दहा-पंधरा  वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज कोपरगाव (kopergoan) शहरात आगमन झाले.

जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे कोपरगावात आगमन होणार असल्याने मिरवणुकीची आधीपासूनच जय्यत तयारी सुरु होती.

शहरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुतळा दाखल झाला. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात व ढोलताशांच्या गजरात व फटाक्याच्या अतिषबाजीत मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com