Video : राहुरी खुर्दमध्ये सरपंचपदाच्या निवडीवेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले; काही काळ तणाव, पाहा व्हिडिओ

पोलिसांच्या प्रसंगावधानाने राडा टळला
Video : राहुरी खुर्दमध्ये सरपंचपदाच्या निवडीवेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले; काही काळ तणाव, पाहा व्हिडिओ

राहुरी | Rahuri

गुरुवारी दुपारी राहुरी खुर्द ग्रामपंचायत (Rahuri Khurd Grampanchayat) सरपंचपदाच्या निवडीवेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने पोलिसांची (Police) दमछाक झाली.

(व्हिडिओ - राजेंद्र आढाव)

पोलिस बळ कमी पडल्याने दोन मंडळाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा वाद होण्याची चिन्हे देखील निर्माण झाली होती. परंतु पोलिसांच्या प्रसंगावधानाने दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यात करण्यात पोलिसांना यश आले.

राहुरी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मलाताई मालपाणी (Nirmalatai Malpani) यांच्या निधनानंतर या ठिकाणी सरपंच निवड लागली होती. या सरपंच निवडीवेळी गावात वातावरण तणावग्रस्त बनले आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.

दरम्यान राहुरी खुर्दमध्ये सत्तांतर झाले राष्ट्रवादीकडून सत्ता भाजपाकडे गेली आहे. भाजपाच्या मालती साखरे यांची सरपंचपदी निवड झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com