वृध्देश्वरच्या इथेनॉल प्रकल्पाची वेळेत उभारणी करू

राहुल राजळे : गाळप हंगामाची सांगता, कामगारांना दहा दिवसांचा अतिरिक्त पगार देणार
वृध्देश्वरच्या इथेनॉल प्रकल्पाची वेळेत उभारणी करू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

साखरेला कमी बाजारभाव, अत्यल्प मागणी तसेच आर्थिक अडचण असूनही संचालक मंडळाने सर्व अडचणींवर मात करत यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडला. कारखान्याच्या डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्पास शासनाकडून आर्थिक व प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून इथेनॉल प्रकल्पाची उभारणी वेळेत पूर्ण करावयाची आहे. सर्व कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेऊन यार्षीचा गळीत हंगाम यशस्वी केल्यामुळे कर्मचार्‍यांना 10 दिवसांचा पगार बक्षीस देणार असल्याचे प्रतिपादन संचालक राहुल राजळे यांनी केले.

तालुक्याची कामधेनू असलेल्या व आ. मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 2020-21 वर्षीच्या यशस्वी गळीत हंगाम सांगता कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या अध्यक्षतेखाली कोवीडच्या नियमांचे पालन करून झाला. त्यावेळी राजळे बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष रामकिसन काकडे, संचालक सुभाषराव ताठे, सुभाषराव बुधवंत, बाबासाहेब किलबिले, शरद अकोलकर, डॉ.यशवंत गवळी, बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे, अ‍ॅड.अनिल फलके, कुशिनाथ बर्डे, कोंडीराम नरोटे, सरव्यवस्थापक भास्कर गोरे, सहाय्यक सचिव रवींद्र महाजन, प्रशासकीय अधिकारी विनायक म्हस्के, चिफ अकाउंटंट संभाजी राजळे, कार्यालयीन अधीक्षक आदिनाथ राजळे, जनसंपर्क अधिकारी अंकुश राजळे आदींसह कारखान्याचे सभासद सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कामगार, कर्मचारी हजर होते.

यावेळी ज्येष्ठ संचालक वाघ म्हणाले, कारखान्याने या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये अनेक अडचणींवर मात करून पाच लाख 21 हजार टन उसाचे गाळप करून पाच लाख 51 हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कारखान्याची अशीच यशस्वी वाटचाल यापुढील काळातही कायम राहिल. यावेळी सेवानिवृत्त झालेल्या 19 कर्मचार्‍यांचा सपत्नीक व हंगामामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या गुणवंत कर्मचार्‍यांचा अध्यक्ष आप्पासाहेब राजळे व उपस्थित संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. प्रास्ताविकात कार्यकारी संचालक पवार यांनी यशस्वी गळीत हंगामाच्या कामकाजाची माहिती दिली व पुढील वर्षाच्या गाळप हंगामाबाबतचे नियोजन याची सविस्तरपणे माहिती दिली. उपस्थितांचे आभार संचालक श्रीकांत मिसाळ यांनी मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com