1 ऑगस्टपासून जनावरांच्या डॉक्टरांचा संप

पशू वैद्यकीय सेवा विस्कळीत होणार : पशूसंवर्धन आयुक्तांचे दुर्लक्ष
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने (Veterinary Practitioners Association) (जनावरांचे पद्वीका डॉक्टर) 15 जूनपासून वेगवेगळ्या टप्प्यानूसार असहकार आंदोलन (Movement) सुरू केलेले आहे. मात्र, या आंदोलनाकडे पशूसंवर्धन आयुक्तांनी दुर्लक्ष (Ignored by the Commissioner of Animal Husbandry) केले असून यामुळे संतप्त झालेल्या पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्यावतीने 1 ऑगस्टपासून संप करण्याचा इशारा (Strike Hint) दिला आहे. यामुळे नगरसह (Ahmednagar) राज्यातील पशू वैद्यकीय सेवेवर त्याचा प्रभाव पडणार आहे.

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्यावतीने 15 जूनपासून पहिल्या टप्प्यातील असहकार आंदोलन सुरू करत लसीकरणासह (Vaccination), ऑनलाईन अहवाल (Online Report) भरण्याचे काम बंद केले होते. त्यानंतर दुसर्‍या टप्यात 25 जूनपासुन राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्य याना निवेदने देऊन मागण्यांकडे लक्ष वेधत त्यांना निवेदन दिले होते. या निवेदनात सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट अ पंचायत समिती या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट अ पंचायत समिती हे करू नये, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या तिसर्‍या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्‍चितीत सुधारणा करावी, ग्रामसेवक व कृषी सहायक (Agricultural Assistant) यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचार्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवासभत्ता मंजूर करावा, पदविका प्रमाणपत्र धारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करून शासन अधिसूचना 27 आगस्ट 2009 रद्द करून सुधारित अधिसूचना काढावी, यासह अन्य मागण्याचा (Demand) समावेश होता.

दरम्यान, पशूसंवर्धन आयुक्तांनी आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेसोबत ऑनलाईन बैठकीचे नियोजन (Online meeting planning) केले. प्रत्यक्षात ती बैठक घेतली नाही. पशूसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या डॉक्टरांच्या आंदोलनकडे गांर्भियाने पाहत नसल्याने अखेर पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने 1 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे नगरसह राज्यातील पशू सेवेवर त्याचा परिणाम होणार आहे. एकट्या नगर जिल्ह्यात 14 लाख 50 हजार पशूधन असून त्यांचा आरोग्याचा प्रश्‍न यामुळे निर्माण होणार आहे. हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. सुनील काटकर, नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनावळे, कार्याध्यक्ष आर.डी. चौधरी, कोषाध्यक्ष पवन भागवत, सरचिटणीस एम.पी. कानोळे यांनी केला आहे..

आंदोलनात राज्यातील 2 हजार 853 पशू आरोग्य संस्थांमधील 4 हजार 500 पशुचिकित्सा व्यवसायी सहभागी होणार असून या आंदोलनाला आता खासगी पशू वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या जनावरांच्या डॉक्टरांनी पाठींबा दिला आहे. यामुळे जनावरांचे डॉक्टरांचा संप सुरू झाल्यास पशूधनाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com