वेळापूरला पिसाळलेल्या लांडग्याचा हल्ला; एक जखमी
File Photo

वेळापूरला पिसाळलेल्या लांडग्याचा हल्ला; एक जखमी

वनविभागाला माहिती देऊनही दुर्लक्ष

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील वेळापुर येथील अनिल तुकाराम खोडके (वय 48) याच्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करुन जखमी केले. मात्र वनविभागाच्या अधिकार्‍यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तेव्हा वनविभागाने या जखमी व्यक्तीला तात्काळ वैद्यकिय आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वैराळ यांनी केली आहे.

राजेंद्र वैराळ यांनी सांगितले, अनिल खोडके 19 मे रोजी सायंकाळच्या सुमारास शेतातून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्यावर मंडलीक वस्ती परिसरात पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला. त्यात त्यांचे डोळ्याला मोठी इजा झाली. त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यांत आले. तेथून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यांत त्यांना 15 टाके पडले. एव्हढी मोठी घटना होऊनही वन विभागाचे अधिकारी व त्यांचे कर्मचारी वन हद्दीतून होत असलेल्या वाळू वाहतुकीची वाहने धरून त्यांच्याकडून चिरीमिरी गोळा करत असल्याचा आरोप राजेंद्र वैराळ यांनी केला

याप्रकरणी वनाधिकारी श्रीमती माने व सोनवणे यांच्याशी वैराळ यांनी संपर्क साधला. जखमी अनिल खोडके यांची परिस्थीती गरीबीची आहे तरी त्यांना तत्काल वैद्यकिय आर्थिक मदत द्यावी व तालुक्यातील बिबटे, लांडगे आदिं हिंस्र वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतात रात्री अपरात्री पाणी भरणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा द्यावा व लोकवस्तीत नागरिकांवर वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले थांबवण्यासाठी धडक कारवाई करून त्याबाबतचा आराखडा तयार करावा अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com