वेळापूर सोसायटीत सत्तांतर, कोल्हे गटाची सत्ता संपुष्टात

वेळापूर सोसायटीत सत्तांतर, कोल्हे गटाची सत्ता संपुष्टात

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे गटाला धूळ चारून सर्वच्या सर्व 13 जागा काळे गटाने जिंकून कोल्हे गटाची सत्ता संपुष्टात आणली आहे.

मागील अनेक वर्षांपासून वेळापूर सोसायटीवर कोल्हे गटाची एकहाती सत्ता होती. माजी आ. अशोकराव काळे, ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने पंचवार्षिक निवडणुकीत पॅनल उभा करून सत्ताधारी कोल्हे गटापुढे मोठे आव्हान उभे केले होते. काळे गटाने कोल्हे गटाचे सर्व मनसुबे उधळून लावत सभासदांना सत्ता परिवर्तनाचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सोसायटीच्या सुज्ञ सभासदांनी प्रतिसाद देऊन वेळापूर सोसायटीमध्ये कोल्हे गटाला पायउतार करून पाचवे सत्ता परिवर्तन करीत वेळापूर सोसायटीची सत्ता काळे गटाच्या ताब्यात दिली आहे.

या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार दीपक रामदास पाटोळे, राजेंद्र खंडेराव गुजर, नवनाथ धोंडीराम गोरे, सोपान रंगनाथ जाधव, अशोक सखाहारी भगत, जयवंत दत्तात्रय मंडलिक, अमोल सुनील वैराळ, सुनील श्रीपत वैराळ, बाळू गणपत पगारे, परिगाबाई तुकाराम खोडके, मंगल भाऊसाहेब गोरे, विजय दत्तात्रय आहेर, बाळासाहेब लक्ष्मण शिंदे या विजयी उमेदवारांचा समावेश आहे.

या निवडणुकीत रतन कदम, दगू गोरे, वसंतराव वैराळ, दिलीप वैराळ, देवराम वैराळ, अशोक आहेर आदींसह काळे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून परिश्रम घेत या निवडणुकीत कोल्हे गटाला धोबीपछाड देत 5 वे सत्तांतर घडवले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे व निवडणुकीत परिश्रम घेणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचे माजी आमदार अशोकराव काळे, ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र जोशी यांनी काम पाहिले. सचिव संजय दिघे यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com