वाहने चोरणारे दोघे जेरबंद

वाहने चोरणारे दोघे जेरबंद

8 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

ट्रॅक्टर (Tractor) व ट्रॉली (Trolley) चोरुन नेणार्‍या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपींनी (Accused) विविध ठिकाणाहून चोरलेली 8 लाख 30 हजाराची एकूण सहा वाहने पोलिसांनी जप्त (Vehicles seized by Police) केली आहे.

वाहने चोरणारे दोघे जेरबंद
श्रीरामपुरातून पाच गावठी कट्टे पकडले

जोर्वे नाका (Jorve Naka) येथून नफिस अनिश पठाण (रा. संगमनेर) यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (Tractor) व लाल रंगाची ट्रॉली (Trolley) नेहमीच्या ठिकाणी जोर्वे नाका, संगमनेर येथे लावलेली असताना कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. याबाबत पठाण यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये (Sangamner City Police Station) गुन्हा रजिस्टर नंबर. 164/2021 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

वाहने चोरणारे दोघे जेरबंद
हाती आलेल्या नोंदी करणार भांडाफोड

सदर गुन्ह्यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गुंजाळवाडी शिवारातील विजय उर्फ सोनु रावसाहेब गुंजाळ व जवळे कडलग गावातील अनिकेत उध्दव कडलग यांनी संगमनेर शहरातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली चोरी केलेली असुन ट्रॅक्टर अनिकेत कडलग याचे घरासमोर लावलेला आहे तसेच त्याने मोटार सायकल व पिकअप गाडीची चोरी केले असुन तो अशा प्रकारे चोरीचे गुन्हे करत आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने राहुल मदने यांनी आरोपीतांना ताब्यात घेण्याबाबत पथकातील अंमलदारांना सूचना दिल्याने पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.

वाहने चोरणारे दोघे जेरबंद
कर्जुलेपठार शिवारात ट्रॅक्टर उलटून एक ठार

आरोपींकडे चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवन विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे विजय उर्फ सोनु रावसाहेब गुंजाळ (वय 22, रा. गुंजाळवाडी शिवार, वेल्हाळे रोड, संगमनेर), अनिकेत उध्दव कडलग (वय 25, रा. वडगाव लांडगा रोड, जवळे कडलग, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले.

आरोपींनी संगमनेर शहरातुन एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली, पुणे येथुन तीन मोटार सायकल व एक पिकअप गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपींकडुन एक संशयीत लाल रंगाची तवेरा गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकातील पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांनी केली आहे. सदर आरोपी हे संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गजानन गायकवाड हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com