
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गाडी पार्किंग करण्याच्या कारणातून दोघा बहिणींना मारहाण करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी नालेगाव भागात घडली. याप्रकरणी तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 वर्षीय पीडिताने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
गायत्री अजय गायकवाड, आशा विठ्ठल गायकवाड, ज्ञानेश्वर उर्फ अजय विठ्ठल गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास कामाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. त्याचवेळी गायत्री व आशा यांनी गाडी पार्किंगच्या कारणातून फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीला मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची बहिण तेथे आली असता तिला देखील मारहाण करण्यात आली.
ज्ञानेश्वर उर्फ अजय याने फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तू जर आमच्या नादी लागली तर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.