पाथर्डीच्या युवकाचा नेवासा फाट्यानजिक वाहनाच्या धडकेत मृत्यू

पाथर्डीच्या युवकाचा नेवासा फाट्यानजिक वाहनाच्या धडकेत मृत्यू

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील प्रवरासंगम (Pravara Sangam) येथील गोदावरी पात्रातून (Godavari River) पायी कावडीने पाणी घेवून जात असलेल्या तरुणाला नेवासा फाट्यानजिक (Newasa Phata) शेवगाव रोडवर अज्ञात वाहनाने धडक (Vehicle Hit) दिल्याने त्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन अज्ञात वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

पाथर्डीच्या युवकाचा नेवासा फाट्यानजिक वाहनाच्या धडकेत मृत्यू
नेवाशात प्रवरा पात्रातून वाळू उपसा; चौघांवर गुन्हा दाखल

याबाबत संतोष बाबासाहेब आव्हाड (वय 20) धंदा-मजुरी रा. चिंचोडी (शिराळ) ता. पाथर्डी यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आमच्या गावची यात्रा असल्याने मी तसेच माझा मोठा भाऊ दीपक बाबासाहेब आव्हाड तसेच गावातील इतर लोक असे 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कावडीचे पाणी घेवून जाण्याकरीता प्रवरासंगम ता. नेवासा येथे आलो होतो.

पाथर्डीच्या युवकाचा नेवासा फाट्यानजिक वाहनाच्या धडकेत मृत्यू
महसूल पथकावर जीवघेणा हल्ला

रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कावडीचे पाणी घेवून माझा मोठा भाऊ दीपक आव्हाड तसेच आमच्या गावातील रितेश काळे, ज्ञानेश्वर तुपे, अजय तुपे, आदित्य तुपे, संदिप तागड, ऋषीकेश जर्‍हाड असे नेवासा फाट्यापासून पुढे भानसहिवरा जाण्या रोडने अंदाजे एक किलोमीटर अंतरावर रोडच्या डाव्या बाजूने चालत असताना अज्ञात पांढर्‍या रंगाच्या चारचाकी गाडीवरील चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी ही रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष (Ignore) करुन हयगयीने अविचाराने भरधाव वेगात चालवून माझा मोठा भाऊ दीपक बाबासाहेब आव्हाड (वय 22) यास मागून जोराची धडक देवून त्याच्या मृत्यूस (Death) कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता निघून गेला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकावर अपघाताचा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

पाथर्डीच्या युवकाचा नेवासा फाट्यानजिक वाहनाच्या धडकेत मृत्यू
बाजार समिती निवडणूक : जिल्ह्यात विक्रमी अर्ज दाखल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com