अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर- लोणी महामार्गावर (Sangamner Loni Highway) सोमवारी सकाळी रस्ता ओलांडत असताना बिबट्याला (Leopard) अज्ञात वाहनाने (Vehicle) जोरदार धडक दिल्यामुळे बिबट्या गंभीर जखमी (Leopard Injured) झाला आहे. या बिबट्याला मोठ्या शिताफीने वनविभागाने (Forest Department) ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी निंबाळे येथिल रोपवाटिकेत हलविले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी
ना.विखेंच्या मध्यस्थीने शिर्डीतील वादावर पडदा

सोमवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास संगमनेर-लोणी महामार्गावरील (Sangamner Loni Highway) चिचंपूर फाट्यालगत असलेल्या अस्मिता डेअरी जवळ एक भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला (Leopard) बेदरकारपणे उडवले व सुसाट वेगाने ते वाहन पुढे निघून गेले. यावेळी जोरदार प्रहार झाल्यामुळे हा बिबट्या जबर जखमी होत रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात जाऊन पडला होता.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी
उक्कलगावातून अवैध वाळू उपसा

यावेळी येथिल स्थानिक नागरीकांनी याबाबतची माहिती वनविभागाला (Forest Department) दिली असता घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनकर्मचारी अशोक गिते, रवींद्र पडवळ, सोनवणे, जारवाल व मुंढे यांच्यासह आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शांताराम झोंडगे व संतोष शिंदे घटनास्थळी हजर झाले होते.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी
संगमनेर नगरपरिषदेचे कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर

यावेळी वनविभागाने लांब काठीच्या साह्याने बनवलेल्या फाशाच्या मदतीने बिबट्याला (Leopard) अलगद पिजंर्‍यात टाकले. यानंतर या बिबट्याला निबांळे येथिल रोपवाटिकेत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अंदाजे 3 वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिले आहे. तर अपघातात या बिबट्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याबरोबरचं कबंरेला मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी
मोटार वाहन निरीक्षकांवर अफरातफरीचा गुन्हा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com