
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
अज्ञात वाहनाने धडक (Vehicle Hit) दिल्याने दुचाकीवरील (Bike) एकजण ठार तर एक जखमी (Injured) झाल्याची घटना घडली. काल दुपारी हा अपघात (Accident) तालुक्यातील घायगाव पाटीजवळ (Ghaygav Pati) घडला. मृतात जांबरगाव येथील एकाचा समावेश आहे.
सतिश साहेबराव चव्हाण (वय 45) व दत्तात्रय साहेबराव चव्हाण (वय 36, दोघे रा. जांबरगाव ता.वैजापूर) हे दुचाकीने शहरात येत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला (Bike) घायगाव पाटीजवळ एका वाहनाने जोराची धडक (Vehicle Hit) दिली. त्यात सतिश चव्हाण व दत्तात्रय चव्हाण जखमी झाले. अपघातानंतर (Accident) परिसरातील ग्रामस्थांनी या दोघांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करुन सतीश चव्हाण हे मृत झाल्याचे घोषित केले. तर दत्तात्रय याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. दुचाकीला धडकलेल्या वाहनासह चालक फरार झाला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात (Vaijapur Police Station) आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.