वाहन शोध संस्थेच्या मदतीने सोनई पोलिसांनी लावला 89 बेवारस वाहनांचा शोध

ओळख पटवून मुळ मालकांनी वाहने घेवून जाण्याचे आवाहन
वाहन शोध संस्थेच्या मदतीने सोनई पोलिसांनी लावला 89 बेवारस वाहनांचा शोध

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई पोलीस ठाणे व गंगामाता वाहन शोध संस्था, पुणे यांनी संयुक्त विद्यमाने 89 बेवारस वाहनांच्या मुळ मालकांना शोधून काढले असून मुळ मालकांनी 15 दिवसात ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन सोनई पोलिसांनी केले आहे.

सोनई पोलीस ठाण्यात वाहनाचा प्रकार, चेसीस क्रमांक, इंजिन कमांक, वाहन मालकाचे नाव, पत्ता व वाहनांची यादी लावण्यात आली आहे. त्यानुसार वाहन मालकांनी 15 दिवसांत आपले वाहन घेऊन जाण्याचे सांगितले आहे पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतीक्षेत धुळखात पडून आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पुढाकार घेऊन बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना दिले होते.

त्यानुसार श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलिसांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी परंदवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे येथील गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली. पोलिसांनी बेवारस वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांकावरून 89 वाहनांच्या मालकांचा शोध लावला.

मूळ मालकांचा शोध लावण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, पोलीस हवालदार प्रवीण आव्हाड व पोलीस कॉन्स्टेबल महेश सावंत यांच्यासह गंगामाता शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, संजय काळे व भारत वाघ यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचे वाहनचालक व नागरिकांकडून कौतुक होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com