अज्ञात वाहनाच्या धडकेत आठ शेळ्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत आठ शेळ्या ठार

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील दत्तात्रेय रंगनाथ अकोलकर हे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता शेतातून शेळ्या घराकडे घेऊन जात असताना अहमदनगर - पाथर्डी रस्त्यावरील कान्होबावाडी फाट्याजवळ अकोलकर यांच्या 15 शेळ्या रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने या शेळ्यांना जोराची धडक दिल्याने या अपघातात आठ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अज्ञात वाहन चालक मात्र तिथून काही वेळात पसार झाला. शेतकरी दत्तात्रय अकोलकर यांनी आरडाओरड केली मात्र अज्ञात वाहन चालक सुसाट वेगाने पळून गेला. या दुर्दैवी घटनेमुळे अकोलकर यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच करंजी बस स्थानक परिसरात काही तरुणांनी वाहने अडवून विचारपूस केली मात्र अपघात ग्रस्त वाहनाचा कुठेही शोध लागला नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com