काळ्या काचांच्या 115 वाहनांवर कारवाई

कोतवाली पोलिसांची मोहिम || 95 हजाराचा दंड
काळ्या काचांच्या 115 वाहनांवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाहनांच्या काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स (Vehicle Black Glass) लावून काचा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या वाहन चालकांवर कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) धडक कारवाई केली आहे. वाहनांना काळ्या काचा (Vehicle Black Glass) लावणार्‍या 115 जणांवर कारवाई करण्यात आली असून, 95 हजार 500 रूपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच, विना नंबर वाहन, फॅन्सी नंबर प्लेट्सही पोलिसांच्या (Police) रडारावर असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहने तपासली जात आहेत.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (Violation of Traffic Rules) करून वाहन चालवणार्‍या बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवण्यासोबतच वाहनांवर काळ्या काचा लावणार्‍यांवर कोतवाली पोलीसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. नियमांचा भंग करत वाहनांना काळ्या फिल्म्स लावणारे आणि फॅन्सी नंबर प्लेटधारकांची संख्या मोठी असल्यामुळे ही कारवाई अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) मोहीम हाती घेतली आहे. 115 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार श्रीकांत खताडे, रामदास थोरात, गुलाब शेख, मुकुंद दुधाळ, शिवाजी मोरे, राजेंद्र अमोल गाडे, सुजय हिवाळे, अभय कदम, अतुल काजळे, सोमनाथ राऊत व इतर यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com