चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक

चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी (MIDC) परिसरातुन वाहनांच्या बॅटरीची चोरी (Vehicle Batteries Theft) करणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्यांच्याकडून 20 हजार रूपये किमतीचा चोरीचा (Theft) मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शाम विरेंद्रकुमार त्रिवेदी (वय 30 रा. नवगस्ता जि. कानपुर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव), बाळु भगवान डोंगरे (वय 38 रा. तरडगव्हाण ता. शिरूर कासार, जि. बीड, हल्ली रा. रेणुकानगर, नागापुर) अशी अटक (Arrested) केलेल्यांची नावे आहेत.

चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक
गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील 195 ग्रा.पं.च्या निवडणुकीचा बार?

प्रकाश बबनराव डोंगरे (वय 54 रा. आनंद बिहार, नवनागापुर) यांच्या ट्रॅक्टर मधून बॅटरी व लोखंडी पाईप असा एकुण 20 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल काल (सोमवारी) पहाटे चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी प्रकाश डोंगरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा शाम त्रिवेदी व बाळु डोंगरे यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना अटक करण्यात आली आहे.

सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश पालवे, राजु सुद्रीक, बंडू भागवत, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सुरज देशमुख यांच्या पथकाने केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com