भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन

भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेला रिक्षा चालकाने शिवीगाळ करत गैरवर्तन केले असल्याची घटना सोमवारी सायंकाळी सावेडी उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षा चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन
धक्कादायक ! बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिला ठार

सुभाष खळे (रा. भिंगारदिवे मळा, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. फिर्यादी सोमवारी सायंकाळी भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्या भाजीपाला घेत असताना तेथे सुभाष खळे आला. त्याने फिर्यादीच्या मुलाविषयी वाईट भाषेत बोलून फिर्यादीला शिवीगाळ केले. तसेच फिर्यादीला रिक्षामध्ये ओढून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन
करोडीतील ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या 'त्या' मुलीचा मृत्यू
भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन
श्रीरामपूर, राहाता बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com