भाजीपाला विक्रेत्यावर हल्ल्याचा संशय; गुन्हेगार टिंग्यासह चौघांना पकडले

भाजीपाला विक्रेत्यावर हल्ल्याचा संशय; गुन्हेगार टिंग्यासह चौघांना पकडले

अहमदनगर|Ahmedagar

भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हत्याराने हल्ला (Vegetable Seller Attacked with a Sharp Weapon) करून सोन्याची चैन चोरून (Stealing the Gold Chain) नेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती. या गुन्ह्यात चार संशयीतांना कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) ताब्यात घेतले आहे. मंगळवारी त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौघांकडे चौकशी केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे (PI Sampat Shinde) यांनी सांगितले.

भाजीपाला विक्रेत्यावर हल्ल्याचा संशय; गुन्हेगार टिंग्यासह चौघांना पकडले
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना बंदी

दरम्यान ही लुटमार टिंग्या टोळीने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी टिंग्या व त्याच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले. टिंग्या टोळी कोतवाली व तोफखाना हद्दीत लुटमार करण्याचे काम करते. या टोळीवर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सकाळी अहमदनगर शहरातील जुन्या कोर्टाजवळील हिमगिरी बिल्डींगच्यासमोर भाजीपाला विक्रेते सतिष ऊर्फ बाळासाहेब नारायण नरोटे (रा. चितळेरोड, अहमदनगर) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धारदार हत्याराने हल्ला केला होता. त्यांच्याकडील अडीच लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली होती.

ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून कोतवाली पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने (डिबी) चार संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करण्याचे काम मंगळवारी सुरू होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com